Tuesday, March 15, 2011

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

कणखर देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा. गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा या पेक्षा ते आणखी काय वर्णन करणार माझ्या महाराष्ट्राच. संताच्या वाणीने आणि शिवबाच्या कर्तुत्वाने पावण झालेली ही पतित पावन महाराष्ट्र भुमी. जेव्हा महाराष्ट्रा बद्दल विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला आठवतात ते "संयुक्त महाराष्ट्र चळवळी चे दिवस". होय भारत स्वातंत्र्या नंतरही महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हत. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अनेक प्रांतात विभागलेला होता, विदर्भ हा प्रांत मध्यप्रदेश मधे तर मराठवाडा हैदराबाद च्या निजामशाही मधे तर मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र गुजरात प्रंतामधे विभागलेले होते. आणि बेळगाव हे कर्नाटक (म्हैसुर प्रांत) मधे जे अजुनही तिथेच आहे. या विभागलेल्या विभक्त महाराष्ट्राला संयुक्त करण्यासाठी छत्रपतिंच्या लेकरानी कंबर कसली आणि लाखो गीरणी मजदुर, कामगार आणि दलित वर्गानी एकत्र येवून हा लढा कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदती शिवाय सुरु केला, त्याचं नेतृत्व करायला कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे(बाळासाहेब ठाकरेंचे वडील) ,शाहिर अण्णाभाऊ साठे ई. मंडळी सरसावली होती. १९५५-५६ पासुन सुरु झालेला हा रणसंग्राम तब्बल ५ वर्षे चालला आणि २१ नोव्हेंबर १९५९ रोजी १०५ हुतात्म्याच्या प्राणाची आहुती घेऊन थांबला. आणि कामगार नेते "श्रीपाद
अमृत डांगे" यांची मागणी माण्य होऊन संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न १ में १९६० "जागतिक कामगार दिनी" सत्यात उतरल, तरी बेळगाव च स्वप्न मात्र भंगल, त्या वेळचा नारा होता कि बेळगाव-मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. परंतु गुजरात पासुन मुंबई आणि कर्नाटक पासुन बेळगाव मिळवणे म्हणजे फार मोठी कसरत होती, जवाहरलाल नेहरू सरकार दौभाषिक राज्यावर ठाम होत, मग अश्या वेळेस निर्णय झाला कि आधी मुंबई घेऊ बेळगाव येईलच, म्हणजे "आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे" परंतु लग्नाची वाट बघत रायबा(बेळगाव)म्हातारा झालाय. जरी आज बेळगाव महाराष्ट्रात नसेल तरीही महाराष्ट्र रुबाबात, मोठ्या दिमाघात उभा आहे. पण बेळगाव नसल्याची खंत अजुनही जाणवते.

स्वरराज नावाचा छावा

संगीताच्या क्षेत्रातलं एक बरचस नावाजलेल पण सध्या अनोळखी झालेलं एक नाव म्हणजे दिवंगत संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार मोह.रफी च्या आवाजातलं "हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा"  हे गाण त्यांनीच संगीत बद्द केलेलं. श्रीकांत ठाकरेंची दुसरी ओळख म्हणजे "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे" यांचे धाकटे बंधू, आणि मनसे प्रमुख "राज ठाकरे" यांचे वडील. श्रीकांत ठाकरे ह्यांना संगीता बरोबर व्यंगचीत्राचीही  बरीच जान होती हे बाळासाहेबांच्या मुलाखतीतून बर्याचदा जाणवलं.जसे श्रीकांत ठाकरेंच संगीत प्रत्येक युवकांच्या तोंडी अजूनही राज्य करत आहेत, तसाच त्यांचा मुलगा "राज ठाकरे" हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी युवा मनावर अधिराज्य गाजवतोय.
मागच्या वर्षी पुण्यात शनिवारवाड्या समोर स्व. श्रीकांत ठाकरे संगीत स्मृती पुर
स्कार राज ठाकरे यांच्या हस्ते संगीतकार अजय अतुल ह्यांना देण्यात आला. तेव्हा नेहमी राजकारणावर तिखट बोलणार्या राज ठाकरेंच्या मुखावाटे कलेविषयी आणि त्यांच्या वडिलांविषयी ऐकायला मिळाल, राज ठाकरे म्हणाले, "त्यांच्या वडिलांची इच्छा होती कि त्यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवावा." त्या साठी लहानपणा पासूनच त्यांना संगीताची गोडी ह्वावी म्हणून श्रीकांतजींनी तबला, पेटी, सितार ई चे धडे गिरवणे सुरु केलेत, त्याचं नावही त्यांनी "स्वर-राज ठाकरे" ठेवलेलं म्हणजे स्वरांवर राज्य करणारा, त्यांना अनेक संगीतातले राग शिकवलेत. परंतु राज ठाकरेंना मात्र संगीता व्यतिरिक्त दुसराच राग डोक्यात बसला आणि ते आपले काका "बाळासाहेब ठाकरे" यांच्या कलेशी म्हणजे व्यंगचीत्रा शी अधिक प्रेरित होऊ लागलेत, जसजसे ते मोठे होत गेलेत त्याच्या वर काकांचा प्रभाव अधिकाधिक होत गेला "राज ठाकरे" त्या भाषणात असे हि म्हणाले होते कि त्यांना अमेरिकेला जाऊन तिथे "Holliwood च्या Disney " मध्ये Cartoon Artist म्हणून काम करायची इच्छा होती.