Tuesday, August 17, 2010

कामगार आहे मि तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे..

आज कवितेचा महासूर्य मावळला, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या वरील हा लेख सामना दैनिकात आलाय...
1926-27 च्या काळात चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर बेवारस अवस्थेत फेकून दिलेला एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्या अनाथ बालकाला स्वत:चे नाव दिले नारायण गंगाराम सुर्वे. या कोवळ्या जीवावर गंगाराम यांची पत्नी काशीबाई यांनी मुलासारखे प्रेम दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत वाढलेल्या नारायण सुर्वे यांचे आयुष्य कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून अक्षरश: तावूनसुलाखून निघाले.
दादरच्या अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत शिकणारे नारायण सुर्वे 1936 मध्ये चौथी पास झाले. त्याच वेळी गिरणीतून निवृत्त झालेले गंगाराम सुर्वे कायमचे कोकणात निघून गेले. जाताना त्यांनी हातावर टेकवलेले दहा रुपये हाच छोट्या नारायणचा एकमेव आधार. मग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी नारायण सुर्वे यांचा संघर्ष सुरू झाला. एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशी विसळणारा पोर्‍या, कुणाचे कुत्रे, तर कुणाची मुले सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करीतच ते वाढले. गोदरेजच्या कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले. टाटा ऑईलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीतही काम केले.

Sunday, August 15, 2010

तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से (१५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस)


आज १५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस, १९४७ साली लाल किल्यावर पहिल्यांदा आपल्या नेत्यांनी तिरंगा फ़डकवला आजही फ़डकवला व पुढे ही असाच फ़डकत रहाणार.
१५ औगस्ट आला कि मला माझ लहानपण आणि शाळेचे दिवस आठवतात. ते लवकर लवकर उठुन छानसा पांढरा शुभ्र uniform घालुन सकाळी सकाळी शाळेत जायच, ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन, सगळी लहान मंडळी एका रांगेत चपटासा भांग पाडुन ऊभी असलेली ध्वजाला Salute करत "जण-गण-मण" म्हणायची व N.C.C. ची परेड व्हायची.
आम्ही सगळे मांडी घालुन बसायचो नंतर पहुण्यांच भाषण व आमच्यातल्याही काही लाहाणग्याची भाषणेही होत.
ही सगळी कर्यक्रम आटोपल्यावर सगळ्याना गोळ्या, बिस्किटांचे वाटप व्हायचं, आणि लगेच सुटी मग काय धावत धावत घरी जायच, जात असतांना हातात एक छोटा तिरंगा आणि तोंडात एखाद देश्भक्तीच गाण गात घराकडे जात तिरंगामय झालेल गाव बघत जातांना अगांवर शाहारे येत, जिथे तिथे देशभक्तीपर गाण्याचे आवज येकु येत. दिवसभर उनाडक्या करुन घरी आल्या नंतर टि.व्ही. वर सुध्दा देशभक्तीपर चित्रपट सुरु असायचेत. हतात तिरंगा, गावागावात सगळी कडे तिरंगा आणि टि.व्ही. वरही नाना पाटेकरचा तिरंगा, त्यातला राज कुमार चा संवाद आठवतो "ना तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से, बंदा डरता है तोह सिर्फ़ परवर्दिगार से "

Sunday, August 8, 2010

आता आपलं सरकार आलंय.....

आपल्या Blog चे नियमित वाचक, माझे एक मित्र यांनी आपल्या सरकार बद्दल चा आपला आनंद कही अश्या प्रकारे व्यक्त केला आहे।











सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंयसगळं होणार..... ।। धृ ।।

आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु।, तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।

आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत१० वर्षांत जे करता आले नाही
ते २ वर्षांत करणार,दिवसभर वीज जाणार,
रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।

रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।

आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।

पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।

तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।

Tuesday, August 3, 2010

गृहमंत्री म्हणाले......

बेळगाव सीमा प्रश्नावर गेल्या बर्याच दिवसापासून महाराष्ट्र व करनाटकात द्वंद युद्ध सुरु आहे. आज लोकसभेत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावरून जोरदार गोंधळ झाला . महाराष्ट्रातील खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे खासदार उभे राहिले. महागाईची चर्चा होण्याआधी बेळगाव सीमा प्रश्नावर चर्चा व्हावी , असा आग्रह महाराष्ट्रातील खासदारांनी धरला . काही दिवसा आधी याच मुद्यावर आपल्या ग्रुहमंत्री साहेबांच एक मजेदार stament वचायला मिळाल होत.
"प्रश्न् सोडवायचा नसेल तर समिती नेमली जाते, तो लांबवायचा असेल तर आयोग नेमला जातो, तो ताणायचा असेल तर कोर्टात धाव घेतली जाते. सीमाप्रश्नचेही नेमके तेच झाले असे सांगून गृहमंत्री म्हणाले कीं, या प्रश्नच्याबाबतीत केंद सरकार वेळकाढूपणा करत आहे. नेमकी भूमिकाही स्पष्ट करीत नाही."
या सिंहावलोकन परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासू व्यक्तींकडून व्यक्त झालेल्या विचारातून जो दस्तऐवज निर्माण होईल तो राज्य सरकारसाठी होकायंत्र ठरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
आता फक्त बघायच आहे की नेमका राजकारणी हां मुद्दा किती दिवस चघळतात ते...

नोंटांवर Expiry Date and Bar-Code…

आज भ्रष्टाचाराचा भस्मासुर आ वसुन बसला आहे. काहि दिवसा आधीच पेपर मधे वाचल होत कि नगर चे साहायक कामगार आयुक्त माहगाई वाढली म्हणुन लाच दुप्पट घेत आहेत. काय सालं समिकरण आहे.
आहो, एकदाचं भाजीपाल्याची,पेट्रोल,डीझेल ची माहगाई कमी करा म्हणुन आंदोलन करता येईल, पण ह्या माहगाई काय?
आता सामान्य माणसाला लाच देणं सुध्दा परवडणार नाही. आता काम कशी होणार सामन्य माणसांची, कारण लाच दिल्याशीवास काम सुध्दा होत नाही आमच्या भारतात.
तस बघीतल तर आपला भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे. आपल्या देशात चिक्कार पैसा आहे, पण नेमका तो आहे कुठे, आणि  तो कोणी, कुठे आणि कसा लपवला आहे हेच कळत नाही. ह्याचे धागेदोरे कोणालाच सापडत नाही. खर म्हणजे सापडत नाही म्हणण्या पेक्षा सापडु दिले जात नाहीत, फ़ारच कोणी प्रयत्न केलाच तर तो काळा पैसा सरळ जातो Swiz बैंक मधे, म्हणजे कटकटचं नको.
बरं, मागच्या निवडनुकीत भाजपाने मोठ्या तोय्रात सांगितल होत कि आम्ही निवडुन आल्यावर सगला काळा पैसा परत देशात आनु. मग आता काय झालय, तुमच सरकार आल नाही म्हणुन तुम्ही या कल्पनेला मुठ-माती तर दिली नाहीत ना? देशहीतासाठी तुम्ही तुमची ही कल्पना सरकार कडे मांडु शकता. कि, या गोष्टीच श्रेय स्वतः ला घेता याव म्हणुन अजुन सत्ता येई पर्यंत देशाच नुकसान बघत राहाणार आहात काय?
खंरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि, कसा हा पैसा वाचवला जाऊ शकतो, हा पैसा आपल्याच अर्थव्यवस्थेतच खेळावा या साठी काही उपाय योजना येवु शकतील का? एक केल जाउ शकत, "जर प्रत्येक नोटांवर एक काळापुअरती Expiry Date टाकली तर!" खरचं कल्पना अजीबात वाईट नाही जर खरचं अशा गोष्टींचा वापर झालाच तर अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडुन येईल.
मि तर म्हणतो कि फक्त Expiry Date च नाही तर प्रत्येक नोटांवर Bar-code छापण्याची व्यवस्था करावी म्हणजे पुर्णपणे electronic नोट प्रत्येक नोटीचा Database देशातला प्रत्येक बन्का जवळ म्हणजे खोट्या नोटांवर सुद्दा बराच आळा बसेल. Australian Fiber वापरुन नोटा बनवण्याच्या कल्पनेपेक्षा ही कल्पना केव्हाही स्वस्त व सुरक्षीत असेल, जर या कल्पनेवर व्यवस्थीत विचार केला गेला व Expertise बसवुन याचा अवलंब करण्यात आला तर काळा पैश्यावर आळा बसेल Income tax बुडवणार्यावर, खंडणी घेणार्यावर सुद्दा प्रत्येकाला expiry date च्या आधी नोटा bankeत जमा कराव्या लागतील व expiry date वाढवुन घ्यावी लागेल आसं झालचं तर मला नाही वाटत आपल्याला २०२० ची वाट बघावी लागेलं.